---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

तरुणावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जळगाव शहर हादरले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२५ । धरणगाव तालुक्यात एकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ताजी असताना जळगाव शहरात जुन्या वादातून तरुणावर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी गोळीबार केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील कायदा सुवस्थेवर प्रश्न चिन्ह होत आहे.

golibar crime jpg webp webp

या गोळीबारमध्ये महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २२ रा.प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथमोपचार उपचार करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---Advertisement---

जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या समोरील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. शहरात रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाला. मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सजवळ भूषण अहिरे याच्या वाढदिवस साजरा केला जात होता. यासाठी महेंद्र सपकाळे हा गेलेला होता. यावेळी विशाल कोळीसह त्याच्या साथीदाराने अचानक हल्ला केला.

महेंद्र यांच्या उजव्या बाजूने कमरेखाली गोळी लागली आहे. तर गोळीबार करून संशयित आरोपी फरार झाले. रामनवमीच्या काळातील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिकारी व बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्याचे प्राथमिक काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment