⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | बातम्या | इच्छुकांनी तापवले जळगाव शहर विधानसभेचे राजकीय वातावरण

इच्छुकांनी तापवले जळगाव शहर विधानसभेचे राजकीय वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहराचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. येथे भाजप व उबाठा गटामध्ये लढत होईल असे चित्र असल्याने दोन्ही पक्षांमधून तिकीटासाठी फिल्डींग लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार राजूमामा भोळे हे सलग दोन पंचवार्षिक पासून निवडून येत आहेत. यंदा भाजपातर्फे त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना आमदार भोळे यांनी मुंबई दौरे वाढविले आहे. भाजपाकडे लेवापाटील समाजाचा मोठा चेहरा म्हणून आ.भोळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या व्यतिरिक्त लेवापाटील समाजातील दुसरा नेता भाजपा कडे नाही. यामुळे भाजपा त्यांना पुन्हा संधी देईल, असे मानले जाते. दुसरीकडे मराठा आरक्षण व जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजपा मराठा समाजातील उमेदवाराला रिंगणात उतरवले, अशीही अटकळ बांधली जात आहे. यामुळे मराठा समाजातील इच्छुकांनीही चाचपणी सुरु केली आहे.

यात मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचे नाव आघाडीवर आहे. शहरातून भाजपातर्फे भाजयुमोच्या राज्य उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील व नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांचेही नाव चर्चेत आहे. सर्व इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढविल्याने भाजपाकडून तिकीट मिळविण्यासाठी सर्वांनीच जोर लावल्याचे दिसून येत आहे. उबाठा गटाला राज्यात वाढता प्रतिसाद पाहता जळगाव शहरातून माजी महापौर जयश्री महाजन व माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन्ही जण लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी भाजपातून आयात उमेदवार करण पवार यांना मिळाली.

आता विधानसभेसाठी जयश्री महाजन व कुलभुषण पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. मातोश्रीवरुन ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळेच आम्ही तयारी सुरु केल्याचे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र तिकीट कुणाला मिळेल, याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.