---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावच्या व्यावसायिकाला लावला 1 कोटींचा चुना ; अशी झाली फसवणूक?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले असून अशात जळगावच्या एका व्यावसायिकाला तब्बल १ कोटी रुपयात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तालूका पोलिसांनी नंदू सुदाम बोरसे याला गुजरातमधील भूज येथून अटक केली आहे.

indian currency

नेमका प्रकार काय आहे?
जळगाव शहरातील शहरातील चंदुआण्णानगर- रेणुकानगरात भाऊसाहेब पाटील हे व्यावसायीक वास्तव्याला आहेत. त्यांना नंदू बोरसे व त्यांचा भाऊ दीपक बोरसे यांनी आपल्या फर्मची बनावट (झेरॉक्स) कागदपत्रे दाखवत, या फर्ममध्ये गुंतवणुक केल्यास जास्त रकमेचा नफा (मोबदला) मिळेल, असे अमिष दाखविले होते.

---Advertisement---

या माध्यमातून दोघा भावांनी पाटील यांच्याकडून तब्बल १ कोटी रुपये लूबाडले. त्यानंतर त्याच पैशांतून पिंप्राळा शिवारात फ्लॅट विकत घेतला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तालूका पेालिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नंदू व दीपक या बोरसे बंधुंविरूद्ध फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस संशयितांच्या शोधात असताना त्यांना नंदू बोरसे याचा ठिकाणा भुज (गुजरात) येथे असल्याचे समजले. त्यांनी लगेच पथक तयार करुन व भुज येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने नंदू बोरसे याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचा भाऊ दीपक याच्याबाबत विचारपूस केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २०) संशयिताला जळगाव जिल्हा न्यायालयात उपस्थित केले असता, २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---