⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

ब्रेकिंग ! कुबेरेश्वर धाम महोत्सवादरम्यान जळगावच्या चिमुकल्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । मध्ये प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्‍वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच आठ लाखांहून अधिक भाविक सिहोरमध्ये पोहोचले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय. या महोत्सवादरम्यान आज शुक्रवारी जळगावच्या एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या महोत्सवादरम्यान दोन दिवसांत दोन महिलांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 73 जण आजारी पडले आहेत.

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्‍वर धाम रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. याचदरम्यान, त्यांचा 3 वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची तब्येत बिघडली, चालताना तो अधिकच आजारी पडला, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.

दरम्यान, अमोघ भट या बालकाचा दफनविधी सीहोरमध्येच करण्यात आला असल्याचे मृत बालकाचे वडील विवेक भट यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना सांगितले.

रुद्राक्ष वाटप बंद

कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा शिवकथा सांगण्याबरोबरच आमंत्रित रुद्राक्षाचे वाटप करणारहोते. परंतु अनियंत्रित गर्दी पाहता काल गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. आज म्हणजेच शुक्रवारी रुद्राक्ष वाटपाच्या दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला आहे. गुरुवारी कुबेरेश्वर धाम येथे गर्दी प्रचंड वाढली होती, त्यामुळे येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान, महामार्गावर वाहनांच्या २० ते ३० किमी पर्यंतचा चक्का जाम झाल्याचे दिसून आले. रुद्राक्ष घेण्यासाठी लोक आपापल्या वाहनाने आले होते, त्यामुळे परताना महामार्गासह लहान मोठे रस्त्यांवर बराच वेळ जाम झाला होता.

या महोत्सवादरम्यान, महाराष्ट्रातील एका महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज शुक्रवारी एक महिला आणि जळगावच्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 73 जण आजारी पडले आहेत.

आता रुद्राक्ष सणात नव्हे तर वर्षभर मिळणार आहे
दरम्यान, शुक्रवारी कथेच्या दुसर्‍या दिवशी पंडित मिश्र म्हणाले – पूर्वीच्या रुद्राक्ष उत्सवापासून हेच ​​कळले आहे की रुद्राक्ष उत्सवाचे आयोजन करावे, रुद्राक्षाचे शिवलिंग करावे, विधी देखील केले पाहिजे. फक्त तो रुद्राक्ष रुद्राक्ष उत्सवाच्या वेळी वाटू नका आणि वर्षभर कुबेरेश्वर धामला येणाऱ्यांना द्या. जे भक्त येऊ शकत नाहीत, ते वर्षभरात कधीही येऊन येथून रुद्राक्ष घेऊ शकतात. मात्र, आता लोक विचार करत आहेत की ही रुद्राक्षाची गर्दी आहे, ही बाबांच्या भक्तांची गर्दी आहे.