---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जळगावात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आपल्याच सरकारला टोला ; म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महिला आरक्षणावरून आपल्याच सरकारला टोला लगावला. सरकारने महिलांसाठी आरक्षणाचा कायदा केला. पण आमचं विधानसभा निवडणुकीत काय होणार? आमच्या जागी महिला असल्या तर काय होईल? हे माहित नाही, असं बावनकुळे म्हणाले आहे.

chandrashekhar bavankule jpg webp

तसेच यावेळी त्यांनी आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून भाषणातून फटकेबाजी केली. मामाने तर जुगाड लावला आहे. मामाच्या जागी मामी राहील. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.

---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आरक्षणाचा कायदा संसदेत पास केला असून आरक्षणाचा फायदा होणार असल्याने देशात 191 महिला खासदार तर 100 महिला आमदार होणार आहेत. 33 टक्के जे महिलांना आरक्षण मिळालं. त्यामुळेच हे शक्य आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. जळगवामध्ये असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगरमध्ये जात बावनकुळेंनी रक्षा खडसेंची भेट घेतली. त्यांच्यासोबत चहा नाश्ता घेतला. तर रावेर लोकसभेच्या जागेबाबत मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या घरी बंद दरवाजाआड चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

एकनाथ खडसेंना आव्हान
एकनाथ खडसेसाहेब तुमच्यात धमक असेल तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीर भाषणात एकनाथ खडसे यांना आव्हान दिलं होतं. मात्र याच आव्हानानंतर बावनकुळेंनी एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---