⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

खळबळजनक : आव्हाणे शिवारात तरुणाचा खून, एक ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव न्यूज | 20 एप्रिल 2024 | एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जात असून मात्र यातच जळगाव आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी जिनींगच्या मागे भरदिवसा परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुरेश परमसिंग सोलंकी (वय – ४० रा.गेहिज खेमला, जि.सेंधावा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एकाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या सुरेश सोलंखी या तरुणाचा आज शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले.

शेतात चारा कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पथक घटनांसाठी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि श्‍वास पथक घटनास्थळी दाखल झाले असून संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.