जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी दहा अंशाखाली गेलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढून १२ अंशांच्यावर गेला आहे. त्यामुळे सकाळी हुडहुडी आणि दुपारी उन्हाचा कडाका कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. गुरुवारी कमाल तापमान २७.८ तर किमान १२.५ अंश होते. दरम्यान महाराष्टात चार दिवसांनंतर पुन्हा एकदा थंडीची वाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे

जळगाव मध्ये तापमानात चढ उतार असला रात्रीच्या वेळेस आणि पहाटे थंडी सोबतच धुकं दिसतं असून हवेत थंडी जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका लागत आहे. सध्या दिवसभर कमाल तापमान साधारण ३० ते ३२ अंशांपर्यंत पोहोचत असून रात्रीच्या किमान १० ते १२ अंशांच्या वर आहे. तापमानातील या तीव्र बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे.

जळगावसह राज्यात पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. आज राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.






