---Advertisement---
जळगाव शहर

जळगावात उपमुख्यमंत्री अजित पवारांची संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हावे यासाठी कळकळीची विनंती केलीय. तसेच आता सहनशीलता संपत आलीय असून टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ajit pawar jpg webp

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कळकळीची विनंती केली. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत , गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधना आहे. असे सगळं असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही. शेवटी एसटी कर्मचारीही आपलेच आहेत व प्रवासीही आपलेच आहेत यामध्ये समजूतदार भूमिका घेणे आवश्यक आहे.

---Advertisement---

माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा ही अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. मात्र या सगळ्याची सहनशीलता संपण्याची वेळा आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे सगळ्या एसटी कामगारांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, असेही ते म्हणाले आहे.

जर कुणी ऐकायला तयार नसेल नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार की नाही. मंत्रिमंडळात चर्चा झाली. टोकाची वेळ येऊ देऊ नये. आग्रहाची विनंती आहे. आता मानधन बऱ्यापैकी वाढवलं आहे. आजूबाजूच्या राज्यांएवढं दिलं आह. एक गोष्ट खरी आहे की पगार कमी होता. आता पगार वाढवला. पगार वेळच्या वेळी देण्याचा निर्णय झाला. परब यांनी शब्द दिला आहे. आम्ही त्याला बांधिल आहोत. आता समंजस भूमिका घ्या. आपण एकाच परिवारातील आहोत. त्यामुळे टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका असे पवार यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---