---Advertisement---
जळगाव जिल्हा पारोळा

टिटवी गावाच्या सरपंचपदी जागृती पाटील ‎‎

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । पाराेळा तालुक्यातील टिटवी येथे ७ ‎रोजी सरपंच पदाची‎ ‎ निवडणूक पार ‎ ‎पडली. यात‎ ‎जागृती विनोद ‎‎पाटील यांचा‎ ‎सरपंच पदासाठी‎ ‎एकमेव अर्ज‎ आल्याने त्यांची बिनविरोध निवड‎ घोषित करण्यात आली.‎

patil 2

दरम्यान, टिटवीच्या पोलिस पाटील पदाचा कारभार विनोद पाटील पाहत असून त्यांची‎ पत्नी जागृती पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याने पतीवर गावाची कायदा‎ सुव्यवस्था सांभाळण्याची तर पत्नीवर गावाच्या सर्वांगीण विकासाची‎ जबाबदारी आली आहे. एकाच घरात गावाची प्रमुख दोन पदे आल्याने‎ तालुक्यात चर्चा व काैतुकाचा विषय ठरत आहे.‎

---Advertisement---

अध्यासी अधिकारी म्हणून मंडल‎ अधिकारी व्ही. एन. राठोड यांनी‎ काम पाहिले तर तलाठी एस. व्ही.‎ वाघमारे, ग्रामसेवक आर. डी.‎ पाटील त्यांना सहकार्य केले. या‎वेळी उपसरपंच दगडू पाटील,‎ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार,‎ किरण माळी, सुनीता माळी,‎ कोकिळा सोनवणे, मीनाबाई‎ ‎ ‎पाटील, युवराज सोनवणे, मानसिंग‎ पवार, सुदाम पवार, गोविंद पवार,‎ प्रेम पवार, महेंद्र खैरनार, तसेच‎ माजी सभापती विजय पाटील,‎ माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग‎ पाटील, माजी सरपंच पुंडलिक‎ पाटील, छोटू माळी, सुधाकर माळी,‎ विनोद पाटील, उदय पाटील,‎ भाऊसाहेब पाटील, रवींद्र पाटील,‎ कमलाकर पाटील, संजय मगर,‎ सतीश पाटील, अमोल पाटील,‎ लोमेश पाटील, सोमनाथ माळी,‎ भरत पाटील, निंबा पाटील, गोरख‎ ‎ ‎पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र‎ पाटील, भगवान पाटील, समाधान‎ मगर, सतीश कोळी, भरत पाटील,‎ विशाल महाजन, मनोज लोहार व‎ ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी‎ नवनिर्वाचित सरपंच जागृती पाटील‎ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार‎ करण्यात आला. या निवडीबद्दल‎ जागृती पाटील यांचे आमदार‎ चिमणराव पाटील व पारोळा बाजार‎ समितीचे सभापती अमोल पाटील,‎ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य‎ विजय पाटील यांनी काैतुक केले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---