जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षणाच्या योजनांची माहिती युवकांना व्हावी यासाठी यासाठी आयोजित पीएम स्किलरन मॅरेथॉन दौंड मध्ये मोठ्या संख्येने आयटीआय विद्यार्थी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे पणे सहभाग घेत दौड पूर्ण केली. या उत्साही क्रीडा प्रसंगाने यावलकरांचे लक्ष वेधून घेतले.
या पीएम स्किल रन’मध्ये विद्यार्थी मधून अजय पावरा प्रथम, कुंदन कोळी द्वितीय, मोहन यावलकर तृतीय, विद्यार्थिनींमधून भाग्यश्री राठोड प्रथम, नेहा नेमाडे द्वितीय, तनुजा तडवी तृतीय, क्रमांकाचे मानकरी ठरले. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्याना विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपयांची पारितोषिक आय.एम.सी चे चेअरमन के. बी. ढाके, सदस्य मनीष चौधरी सर,शशिकांत देशमुख सर, शिल्प निदेशक व्ही. पी. चौधरी सर, संस्थेचे प्राचार्य टी. आर. पाटील, आरोग्य निरीक्षक नरेंद्र तायडे, श्री गणेश आयटीआयचे प्राचार्य तुषार धांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तसेच मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केलं.
यांनी घेतले परिश्रम :
दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पदवी प्रदान समारंभ प्रधान करण्यात आला. प्राचार्य यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला व कार्यक्रम पार पाडण्यास अनमोल असे सहकार्य.. विकास महाजन, शिल्प निदेशक सौ. एस.एन फेगडे मॅडम, निदेशक आशिष भाबड सर, पंकज न्याहाळदे सर, संदीप बढे सर, भुषण देशमुख सर, अरुण येवले सर, भूषण फालक सर, तांबट सर, कु. रागिणी पाटील, तडवी सर, सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.