⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | राष्ट्रीय | इस्रोचा नवा विक्रम! 36 उपग्रहांसह केलं सर्वात वजनदार रॉकेटचं प्रक्षेपित

इस्रोचा नवा विक्रम! 36 उपग्रहांसह केलं सर्वात वजनदार रॉकेटचं प्रक्षेपित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ । इस्रोने आज नवीन विक्रम केला आहे. इस्रोने आज आपले सर्वात वजनदार रॉकेट LVM-3 प्रक्षेपित केले. यूके कंपनी वनवेबचे ३६ ब्रॉडबँड उपग्रह घेऊन रॉकेटने आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथून उड्डाण केले. ISRO launched heaviest rocket with 36 satellites

जगाला उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. ब्रिटनच्या नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेड वनवेब ग्रुप कंपनीने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ७२ उपग्रह स्थापित करण्यासाठी इस्रोच्या व्यावसायिक शाखा न्यूजस्पेस इंडिया लिमिटेड (न्यूस्पेस इंडिया लिमिटेड) सोबत करार केला आहे.

रॉकेटमध्ये इतकी क्षमता?
ISRO ने या मिशनला LVM3-M3/OneWeb India-2 मिशन असे नाव दिले आहे. इस्रोच्या या रॉकेटची क्षमता लो अर्थ ऑर्बिटमध्ये 10 टन आणि जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये 4 टन आहे. LMV3 ची ही सलग पाचवी यशस्वी मोहीम आहे. चांद्रयान-2 मोहिमेचाही यात समावेश आहे.

याआधी इस्त्रोकडून वनवेबसाठी पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान या मोहिमेविषयी माहिती देताना इस्रोने एक नोटिफिकेशन जारी करून म्हटले की LVM-M3/OneWeb India-2 मिशनसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोसाठी ही 2023 मधील हे दुसरी मोहिम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.