जळगाव लाईव्ह न्यूज । देशभरातील लाखो लोक ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी वापरत असलेली भारतीय रेल्वेची IRCTC वेबसाइट अचानक तत्काळ बुकिंग करण्यापूर्वी डाउन झाल्याने युजर्स नाराज झाले आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वेच्या एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी 10:00 वाजल्यापासून तत्काळ तिकिटे उघडली जातात. बरोबर एक तासानंतर, म्हणजे सकाळी 11:00 वाजल्यापासून, रेल्वेच्या स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तत्काळ तिकिटे या वेबसाइटद्वारे उघडली जातात, परंतु गुरुवारी अचानक, तत्काळ तिकिटांच्या वेळी ही साइट डाऊन झाली.
काही वेळाने वेबसाइट सुरू झाली असली तरी लॉग इन करण्यात अडचण येत आहे. वेबसाइटवर समस्या का आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही? याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.