---Advertisement---
हवामान

राज्यात हुडहुडी वाढणार! पुढील दोन दिवस वातावरण राहणार असे? हवामान खात्याची माहिती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२३ । राज्यातील तापमानात चढ-उतचार सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी किमान तापमान घसरल्याने पहाटच्या थंडीचा कडाका जाणवत होता. मात्र राज्यात अवकाळी पावसाचं सावट आल्याने वातावरणात बदल झाल्यांनतर किमान तापमानात वाढ दिसून आली. परिमाणी पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका वाढला होता. मात्र आता राज्यावर ऐन दिवाळीमध्ये आलेलं पावसाचं सावट दूर झालं असून दिवाळीची सुरुवात होताच वातावरणात गारवा निर्माण झालाय.

thandi tempreture

दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहू शकते त्यामुळे तापमानातही चढ-उतचार असतील, अशी माहिती हवामान खात्याने दिलीये.

---Advertisement---

दिवाळीमध्ये दरवर्षी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. मात्र यंदा दिवाळी आधी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चिंतेत होता. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस पुढे असाच सुरू राहिला असता तर शेतीचे आणखी नुकसान झाले असते. मात्र आता पावसाने माघार घेतली असून पुन्हा एकदा गुलाबी थंडी येणार असल्याने बळीराजाही सुखावला आहे.

पुढील आठवडाभर राज्यात साकळी धुके पडण्याची शक्यता असून ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यात थंडी परतणार आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ‘ऑक्टोबर हिट’मध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याने जळगावकर उकाड्याने हैराण झाला होता. मात्र मात्र गेल्या महिन्याचं शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा घसरून थंडीची चाहूल लागली आहे. सध्या पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन असे आल्हाददायक हवामान जळगावकरांना अनुभवायला मिळत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---