⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | राष्ट्रीय | शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । दिवाळीपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात त्सुनामी आली आणि काही तासांतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.

ऑक्टोबर महिना शेअर बाजारासाठी चांगला राहिला नाही. या महिन्यात बहुतांश व्यवहाराच्या दिवशी बाजारात घसरण झाली आहे. आज सकाळपासून बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली असली तरी त्यानंतर गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे विक्री सुरू झाल्यानंतर बाजारात त्सुनामी आली.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही प्रचंड घसरण
आज शुक्रवारी सेन्सेक्स 662.87 अंकांनी घसरून 79,402 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक 218 अंकांनी घसरून 24,180 अंकांवर बंद झाली. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या 30 कंपन्यांपैकी इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 15 ते 16 टक्के घट झाली आहे. एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्सही तोट्यात राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शुक्रवारी दुपारी बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 434 लाख कोटी रुपयांवर घसरले. जे गेल्या सत्रात ४४४ लाख कोटी रुपये होते. असे पाहिले तर शुक्रवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.