भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. रेल्वेने एकूण ३१२ पदांसाठी भरती जाहीर केली असून या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने आयसोलेटेड कॅटेगरीसाठी ही भरती जाहीर केली आहे.

या भरतीद्वारे ज्युनिअर ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसह अनेक पदभरती केली जाणार आहे. या नोकरीसाठीची भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.

रिक्त पदांचा तपशील
रेल्वे भरती मोहिमेत सर्वाधिक पदे ही ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी आहे. २०२ जागांसाठी ही भरती होणार आहे. याचसोबत चीफ लॉ असिस्टंटसाठी २२ जागा, पब्लिक प्रोसिक्युशनसाठी ७ जागा, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टरसाठी १५ जागा, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर पदासाठी २४ जागा ठेवण्यात आल्या आहेत.

रेल्वेतील या भरती मोहिमेत पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. ३० ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पगार
रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे. चीफ लॉ असिस्टंट अशा पदांसाठी ४४,९०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, भाडे भत्ता अशा अनेक गोष्टींचा लाभ मिळणार आहे.








