---Advertisement---
नोकरी संधी

डाक विभागात 44,228 जागांसाठी महाभरती; 10वी उत्तीर्णांना विनापरीक्षा थेट सरकारी नोकरीची संधी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी चालून आली. भारतीय डाक विभागात नवीन भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमार्फत तब्बल 44 हजार 228 जागा भरल्या जाणार आहे. विशेष विनापरीक्षा थेट नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. उमेदवारांची निवड इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे केली जाईल.

indian post Bharti2024 1 jpg webp

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून या भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 15 जुलैपासून सुरु झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट असणार आहे.

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :
1)GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 44228
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी आणि एडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 100/- शुल्क भरावे लागेल. SC/ST/PWD/महिला: फी नाही
इतका पगार मिळेल :
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) -12000/- ते 29,380/-
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10,000/- ते 24,470/-

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 ऑगस्ट 2024

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---