जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक उमेदवार IOB iob.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 66 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया 6 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. Indian Overseas Bank Bharti 2023
रिक्त जागा तपशील:
व्यवस्थापक पद – ५९
वरिष्ठ व्यवस्थापक – ५ पदे
मुख्य व्यवस्थापक – ०२ पदे
अर्ज पात्रता:
IOB भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्जाची पात्रता, वयोमर्यादा इत्यादी तपशीलवार माहितीसाठी येथे दिलेली अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज फी – General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 ते 30 वर्षे, 30 ते 40 वर्षे, 25 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
निवड प्रक्रिया :
भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ऑनलाइन लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळ नंतर कॉल लेटरद्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची कॉल लेटर केवळ ऑनलाइन ई-मेलद्वारे पाठविली जातील. तसेच IOB भरतीशी संबंधित नवीनतम माहितीसाठी IOB वेबसाइटला भेट देत रहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online