⁠ 
रविवार, मे 19, 2024

टोकियो ऑलम्पिक : तब्बल ४१ वर्षानंतर भारताचा हॉकी संघ सेमी फायनलमध्ये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ ऑगस्ट पुन्हा सुखावह ठरला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे.

कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ अखेरच्या वेळेस अंतिम-४ मध्ये जागा बनवू शकला होता. आज झालेल्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला ३-१ ने नमवत भारतीय संघाने हे यश मिळवलं आहे. आता विश्व चॅम्पियन असणाऱ्या बेल्जियम संघासोबत भारतीय संघ भिडणार आहे. भारताच्या आशा पुन्हा उंचावल्या असून सर्वांना सुवर्ण पदकाची आस आहे.

एकेकाळी होता भारताचा दबदबा
स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.