⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

बॅडमिंटनमध्ये भारताने रचला इतिहास ; थॉमस स्पर्धेमध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेची फायनल भारताने जिंकली आहे. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच सुवर्णपदक पदक पटकावले.

प्रथमच थॉमसमध्ये पदक पटकावले
टीम इंडिया बॅडमिंटनने अंतिम फेरीत इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. अंतिम फेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने अँथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसरा सामना दुहेरीत झाला, ज्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने १८-२१, २३-२१, २१-१९ असा पराभव केला. त्याचवेळी, तिसरा सामना एकेरीमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव करून थॉमस स्पर्धेमध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिले.

अंतिम सामन्यात भारतीय संघ
एकेरी: लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावती, दुहेरी: सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, विष्णुवर्धन गौड पंजाला-कृष्णा प्रसाद गरगा, एमआर अर्जुन-ध्रुव कपिला.