बातम्याराष्ट्रीय

..म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला? रोहित शर्माच्या आश्चर्यकारक विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 5 सामन्यांची मालिका सुरू असून या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न (Melbourne) क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला गेला, जिथे भारतीय संघाला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कप्तान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असं असताना रोहित शर्माने आश्चर्यकारक विधान केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय बोलला ते जाणून घेऊयात.. India versus Australia 4th Test

काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्माने मेलबर्न कसोटी पराभवाचं विश्लेषण करताना सांगितलं की, “सामना गमवतो तेव्हा दु:ख होतं. फलंदाजाचा परफॉर्मेन्स असो की नसो. आमच्याकडे संधी होती आणि सामना जिंकू शकलो असतो. हा सामना ड्रॉ करता आला असता. पण युवा खेळाडूंनी तग धरून खेळणं आवश्यक होतं. रोहित शर्माने या वक्तव्यातून पराभवाचं खापर थेट नवख्या खेळाडूंवर फोडलं आहे. पण ते नवखे खेळाडू आहेत ते यातून शिकतील.’असंही तो म्हणाला.

रोहित शर्माचा रोख हा यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याकडे होता, ज्यांनी मधल्या फळीत तग धरून खेळले होते. पंतने टी ब्रेकनंतर चुकीचा फटका मारत बाद झाला, तर जयस्वालला वादग्रस्त निर्णय देत बाद घोषित केले गेले. रोहित शर्मा स्वतःही खेळत नाहीत हे तितकंच खरं आहे, तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावात त्यांनी एकूण 31 धावा केल्या आहेत, त्यांचा बॅटिंग एव्हरेज 6.20 इतका आहे.

पराभवाचे विश्लेषण
रोहित शर्मा म्हणाले, “पराभव होणं हे निराशाजनक आहे. आम्ही शेवटपर्यंत लढू इच्छित होतो, पण तसं झालं नाही. फक्त शेवटच्या सत्रात नाही तर संपूर्ण सामन्यात कुठे चूक झाली हे पाहणं आवश्यक आहे. पूर्ण कसोटी सामन्यात आमच्याकडे संधी होती. आम्ही ऑस्ट्रेलियाला संधी दिली. एक वेळ ऑस्ट्रेलियाचे 90 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button