जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय संकुलात देशभक्तीपर कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । येथील गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमांना राष्ट्रप्रेमाचा उत्साह संचारला होता. संपूर्ण गोदावरी परिसर हा तिरंगामय झाल्याचे चित्र दिसून आले.

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. चंद्रय्या कांते, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ एस एम पाटील,आणि वैद्यकीय रूग्णालयातील सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.यावेळी विविध भक्‍तीपर कार्यक्रम विदयार्थ्यांनी सादर केले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button