⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवावा : सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आहारात तृणधान्याचा वापर वाढविला पाहिजे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विदया इंग्लिश मिडीयम शाळेत वाक्याथॉन, प्रभातफेरी व मिलेट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रभातफेरीत शाळेतील विदयार्थी, शिक्षकवृंद यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

श्री कांबळे म्हणाले, दैनंदिन आहारात तृणधान्याचा समावेश केल्याने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते. पूर्वी गहू हा फक्त सणाच्या दिवशीच सेवन केला जात होता. परंतू सध्या त्याचे आहारातील प्रमाण वाढल्यामुळे त्यातील ग्लुटेनमुळे उच्चरक्तदाब, मधुमेह सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यावर तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढविणे हा एकमेव उपाय आहे.

पौष्टीक तृणधान्याच्या व्यापारात अमर्याद संधी असून ज्वारी, बाजरी पिकविणा-या शेतक-याला या व्यापारात सर्वात मोठी संधी आहे. मराठी माणसाने या उदयोगामध्ये जास्तीत जास्त संख्येने पुढे येवून उदयोगाची गुढी उभारून या माध्यमातून भारताचे नाव जगात पुढे न्यावे. असे आवाहन श्री.कांबळे यांनी केले आहे.