---Advertisement---
जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा! भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या लागत असल्याने बाहेर गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी राहते. सोबतच या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये लग्नसराई देखील असते. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी दिसून येते. दरम्यान उन्हाळा व सुट्ट्यात होणार गर्दी लक्ष्यात घेऊन मध्ये रेल्वेनं बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड आणि खंडवा जंक्शन ते सनावद विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला.

train 1 jpg webp

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष ३० एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ही विशेष गाडी आता ०१ मेपासून ३० जुनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विशेष गाडीच्या ६१ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड ते बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष पूर्वी ३० एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ही विशेष गाडी आता ०१ मेपासून ३० जुनपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या देखील ६१ सेवा होतील.

---Advertisement---

गाडी क्रमांक ०१०९१ खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित विशेष गाडी २९ एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ती गाडी आता ०२ मेपासून ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या ४४ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१०९२ सनावद ते खंडवा जंक्शन अनारक्षित गाडी २९ एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती गाडी आता ०२ मेपासून २४ जुनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीच्या देखील ४४ सेवा होतील. धावण्याचा कालावधी वाढवण्यात आलेल्या या गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यात कोणताही बदल केलेला नाही.

सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्ब्यासाठी तिकिटे यूटीएस ॲपद्वारे घेता येतील. या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढल्याने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment