जळगाव शहर

अखेर जळगाव महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ७५ वरून ८६ वर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । अखेर जळगाव महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता ७५ वरून थेट ८६ वर नेण्यात आली आहे. राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जळगावसह बहुतांश महापालिकांमध्ये यामुळे ११ नगरसेवक वाढणार आहेत.

महापालिका आणि नगरपालिकांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत ३ लाखांपेक्षा अधिक आणि ६ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ७६ तर १) २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकतम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल. २) ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकतम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल. ३) अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व अधिक संख्या ७५ हून अधिक नसेल. ४) ब वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व अधिक संख्या ३७ हून अधिक नसेल. ५) क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.

जळगाव जिल्ह्यातील नपांची स्थिती (कंसात वाढीव)
अमळनेर ३४ (३९), धरणगाव १९(२२), पाचोरा २७ (३१), जामनेर २५ (२९), भडगाव २१(२४), एरंडोल- २२ (२५), चाळीसगाव ३४ (३९),पारोळा २२ (२५), शेंदुर्णी १७ (२०), भुसावळ ४८ (५६), वरणगाव १८ (२१), यावल २० (२३),फैजपूर १७ (२०), सावदा १७ (२०, रावेर १७ (२०), बोदवड १७ (२०), मुक्ताईनगर १७ (२०).

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button