⁠ 
बुधवार, मे 1, 2024

डाळीनंतर आता तांदूळही महागला ; काय आहे प्रति किलोचा दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देखील सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत. डाळी, गव्हाच्या किमतीत वाढ झालेली असताना आता तांदूळही महागला आहे.

तांदूळ प्रति किलोमागे ५ ते ७ रुपये महागले आहेत. चिनोर व कोलम तांदूळ गेल्यावर्षी ४२ रुपये किलो होतो. तो यंदा ४७ ते ५० रुपये किलोने विक्री होतो आहे. वर्षभरासाठी साठवणुकीसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या तांदळाच्या बाजारात यंदा प्रथमच बिहार व उत्तर प्रदेशातून जळगाव बाजारपेठेत उन्हाळी कोलम तांदूळ दाखल झाला आहे

गेल्या काही दिवसात तूरडाळ जवळपास १५ ते २० रुपये तर मूगडाळ १० ते १५ रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या काही दिवसात बाजारात तुरडाळ आणि मूगडाळीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच डाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतेय. सध्या तूरडाळीचा घाऊक दर १६० ते १७० रुपये झाला आहे. तर मूगडाळीचे घाऊक दर ११० ते १२० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे.