⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

जळगावात हरभऱ्याच्या दराने ओलांडला सहा हजाराचा टप्पा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । एकीकडे शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करत असताना, दुसरीकडे रब्बी हंगामातील धान्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरात हरभऱ्याच्या दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली असून, हरभऱ्याच्या दराने सहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे शतकर्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी थेट मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी नेला होता. परंतु त्यावेळी मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागली होती. यंदाच्या हंगामापासून पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याचा भाव स्थिरावलेला आहे.

मात्र गेल्या आठवडाभरात जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली झाली. यामुळे आता हरभऱ्याचा दर ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर गेले आहेत. परंतु या दरवाढीचा काही शेतकऱ्यांनी साठवणूक केल्याने त्यांना फायदा होत आहे.

एकीकडे हरभऱ्याच्या दरात वाढ होत असताना, ज्वारीच्या दरात मात्र वाढ झालेली नाही. ज्वारीचे दर हमीभावापेक्षाही ९०० रुपयांनी कमी आहेत. ३१८० रुपयांचा हमीभाव असताना, जळगाव बाजार समितीत मात्र ज्वारीला २२०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ज्वारी विक्रीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.