⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

प्रवाशांना दिलासा ! भुसावळ-मुंबई सेंट्रल विशेष रेल्वे गाड्याच्या कालावधीत वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेने भुसावळ ते मुंबई सेंट्रल विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी जळगाव, अमळनेर मार्गे मुंबईला जात असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झालीय

ट्रेन क्र. ०९०५१ मुंबई सेंट्रल ते भुसावळ त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.०४. २०२४ पर्यंत आता दिनांक ३०.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्र. ०९०५२ भुसावळ ते मुंबई सेंट्रल त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ०१.०५.२०२४ पर्यंत आता दिनांक ०१.०७.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.