पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून बुधवारी दि १२ जून ला करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश अखेर यश मिळाले.
1. हिवाळ्यातील कमी तापमानाचा निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 32 हजार 179 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. आधीच्या निकषात ही भरपाईची रक्कम 26 हजार 500 इतकी होती.
2. एप्रिल महिन्यातील जास्त तापमानाचा निकषात पात्र झालेला शेतकऱ्यांना आता हेक्टरी 42 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. ती जुन्या निकषात 35 हजार रुपये इतकी होती.
3. मे महिन्यात सलग पाच दिवस 45 अंश तापमान राहिल्यास आता नुकसान भरपाईची रक्कम 52 हजार 821 इतकी करण्यात आली आहे. ती जुन्या निकषांमध्ये 42 हजार रुपये इतकी होती.
4. तर गारपीट व वादळी पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 85 हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. ती जुन्या निकषांमध्ये 70 हजार इतकी होती.
शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची ही रक्कम झाली कमी…
ज्या शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा काढणार आहेत त्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम देखील गेल्या वेळे पेक्षा कमी होणार आहे. 2023-24 मध्ये ही रक्कम हेक्टरी 10 हजार 500 होती. ती आता 8 हजार 500 रुपये इतकी करण्यात आली आहे.