---Advertisement---
भुसावळ

भुसावळ बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली, आगारातून ‘या’ मार्गावरील बस फेऱ्यात वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. काही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत तर काही कर्मचारी कामावर परतल्याने बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यात भुसावळ-जळगाव मार्गावर दिवसभरात ३० बसेस धावत आहे. शिवाय भुसावळातून रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर आगाराच्या बसेस ये-जा करत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

st bus lalpari jpg webp

भुसावळात यांत्रिक विभागातील कर्मचारी वगळता ७ चालक व १२ वाहक कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे भुसावळ आगारातून औरंगाबाद, धुळे, अमळनेर, रावेर, मुक्ताइनगर, बाेदवड व पाचोऱ्यासाठी काही फेऱ्या सुरू झाल्या. औरंगाबाद व धुळे आगाराच्या बसेस भुसावळात येत असल्याने औरंगाबादला जाण्यासाठी ८, धुळ्यासाठी दाेन गाड्या उपलब्ध आहेत. बाहेरील आगाराच्या गाड्या देखील व्हाया भुसावळ जातात. त्यामुळे प्रवाशांची सोय होते.

---Advertisement---

विशेषत: औरंगाबाद मार्गावरील बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. पुण्याला जाणारे अनेक प्रवासी औरंगाबादपर्यंत, तर नाशिकला जाणारे प्रवासी धुळे बसचा आधार घेतात. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास पुणे बसफेरी देखील सुरू केली जाणार आहे. भुसावळ बसस्थानकात आता प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. एसटीभोवती असा गराडा पडतो.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---