---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय वाणिज्य

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा; 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

tax
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाची काळजी घेण्यात आली. दरम्यान अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गासाठी स्वस्त आणि महागड्या गोष्टींची यादी जाहीर केली, त्यासोबतच त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली, ज्याची मध्यमवर्ग वाट पाहत होता.

tax

ती म्हणजे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. नवीन करप्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. मानक वजावट ७५ हजार रुपये आहे.

---Advertisement---

किती बदलला टॅक्स
0 ते 12 लाखांपर्यंत – काहीच कर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर लागणार
16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के आयकर लागणार
20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के आयकर लागणार
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर लागणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---