⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळांची ‘आदर्श’ शाळांमध्ये समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । राज्य शासनाकडून जिल्ह्यातील १७ शाळांची ‘आदर्श’ शाळा म्हणून निवड करण्यात आली असून त्यात जळगाव मनपास्तरावरील एका शाळेचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या १६ तर १ महानगरपालिका शासनस्तरावरून राज्यातील ४८८ शाळांपैकी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना ‘आदर्श’ शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘आदर्श’ शाळा अंतर्गत या शाळांना बांधकामा साठी राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे भरीव निधी देण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या १६ तर १ महानगरपालिका स्तरावरील शाळा आहे.

या शाळांच्या विकासासाठी राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे विकास कामांसाठी तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील ज्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करायचे आहे. त्या शाळांसाठी मोठी बांधकामे बांधणे अपेक्षित असल्याचे शासन निर्देशात म्हटले आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘आदर्श’ शाळा, यात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६ शाळांपैकी गडखांब ता. अमळनेर, उर्दू शाळा, यशवंतनगर-टोणगाव ता.भडगाव, सिद्धेश्वर-वरणगाव ता.भुसावळ, कोल्हाडी ता. बोदवड, माळशेवगे ता.चाळीसगाव, उच्च प्राथमिक शाळा गरताड ता.चोपडा, जि.प.केंद्र शाळा पाळधी ता.धरणगाव, विखरण ता. एरंडोल, पिलखेडा ता.जळगाव, उर्दू प्राथ. तोंडापूर ता.जामनेर, पारंबी ता.मुक्ताईनगर, मध्यवर्ती शाळा जुने गाव ता.मुक्ताईनगर, पुनगाव ता.पाचोरा, विचखेडे ता.पारोळा, ए.जी.हायस्कूल सावदा ता. रावेर, आडगाव ता. यावल अशा १६ शाळा तर जळगाव महानगर पालिकेची शाळा क्रमांक १९ अशा १७ ‘आदर्श’ शाळांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगिलते आहे.