जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । धावत्या रेल्वेचा जोराचा धक्का लागल्याने २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी जळगाव शहरातील सत्यम पार्कजवळील रेल्वे मालधक्क्याजवळ घडली. विजय नवल पवार (वय-२४ रा. सत्यम पार्क, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव असून याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत असे की, शहरातील सत्यमपार्क परिसरात आई वडी आणि दोन भाऊ यांच्यासोबत वास्तव्यास असलेला विजय पवार हा बांधकामाच्या स्टाईलचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तो शौचालयासाठी जवळच्या रेल्वे मालधक्काजवळील रेल्वेरूळाजवळ गेला. त्यावेळी डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ३०३ च्या ३६ स्पॉट जवळ त्याला एका धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. या अपघात त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.