⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी अभियांत्रिकीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानाचे उद्घाटन

गोदावरी अभियांत्रिकीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानाचे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ग्रंथालयामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाचे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे त्या करिता हा उपक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हेमंत इंगळे, प्रा.दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा.महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा.नकुल गाडगे (ग्रंथपाल) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन तसेच डॉ. एस आर रंगनाथन (ग्रंथालय शास्त्रज्ञ) यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर वाचन संकल्प या अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती या विषयावर यतीश भारंबे, काजल पाटील, सुमित पाटील, नंदिनी पाटील, चैताली मरमट, भाग्यश्री सावकारे, रोशनी राजपूत, गुंजन टेमकर आणि काजल साळी यांनी मनोगते त्याचप्रमाणे काही काव्यपंक्ती यांचे सादरीकरण केले.

या अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट, ग्रंथ प्रदर्शन व निबंध स्पर्धा असे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. हे अभियान दिनांक ८ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन वाचन संस्कृती वाढविण्यात योगदान द्यावे असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना केले. अलीकडच्या काळात वाचनापासून दुरावत असणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तके व वाचनासाठी आकर्षित करण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान राबविण्यात येत आहे हे त्यांनी नमूद केले.तसेच या अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये दिनांक ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ पर्यंत वाचन कौशल्य कार्यशाळा, तसेच दिनांक १५ जानेवारी रोजी पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेतील तीन उत्कृष्ट निबंधाचे निवड करण्यात येईल व त्यांना २६ जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या साहित्य प्रकारातील पुस्तकाचे सखोल वाचन करून चिंतनात्मक व समीक्षात्मक परीक्षण निबंध जमा करावा. ही सूचना डॉक्टर हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना केली.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ.केतकी पाटील (सदस्य) यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे तसेच प्रा. खुशाली बेलदार यांनी परिश्रम घेतले. त्यांना महाविद्यालयातील इतर शिक्षकेतर व शिक्षक कर्मचारी यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उत्कर्ष पाटील या विद्यार्थ्याने केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.