⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव शहर महानगरपालिकामातर्फे दोन प्रोजेक्टचे लोकार्पण ; शहरवासीयांना होणार असा फायदा?

जळगाव शहर महानगरपालिकामातर्फे दोन प्रोजेक्टचे लोकार्पण ; शहरवासीयांना होणार असा फायदा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । येत्या २ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका तर्फे २ नाविन्य पुर्ण प्रोजेक्ट चे लोकार्पण करण्यात येत असून या मध्ये पहिला प्रोजेक्ट हा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली जळगाव शहर महानगरपालिका तर्फे विविध ५६ विभागांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवा जसे जन्म दाखला, मृत्यु दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि या सारख्या इतर कामांसाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कोणत्या कामासाठी कोणत्या विभागात जावे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्या कामासाठी लागणारे शासकीय शुल्क इत्यादींची इत्यंभूत माहिती असलेली माहितीपुर्ण व्हिडिओ शृंखला “आता मी काय करू?” चे लोकार्पण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिकेने अशा प्रकारचे व्हिडिओ आजपर्यंत बनवले नसल्याने जळगाव मनपा या मध्ये अग्रेसर ठरणार आहे. भविष्यात हा जळगाव पॅटर्न सुद्धा ठरू शकतो.

या व्हिडिओ श्रृंखलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सिने अभिनेते सुबोध भावे, विजय पाटकर, अभय कुलकर्णी आणि इतर अनेक कलाकारांनी शुभेच्छा आणि आवाहन असलेले व्हिडिओ संदेश दिले आहेत.

सदर ५६ व्हिडिओज च्या शृंखले पैकी प्रथम १७ व्हिडिओ २ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका च्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरुन प्रसारित करण्यात येतील.

या व्हिडिओ ची निर्मिती एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या रिंग रोड स्थित क्रिएटर्स अकॅडमी अँड स्टुडिओ या ठिकाणी चित्रित करण्यात आले असून याची संकल्पना आणि लेखन निलेश वर्मा यांचे आहे. पुणे येथील मनुश्री बिहाडे सह स्थानिक कलाकार ऋषिकेश धर्माधिकारी, उज्वला वर्मा, संदीप केदार, दीपक महाजन या अनुभवी कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे

दिग्दर्शन प्रशांत सोनवणे तर कला दिग्दर्शन हर्षदा गावडे यांनी केले आहे. मेकअप किरण अडकमोल, कॅमेरा अक्षय परांजपे, सहायक कॅमेरा ओंकार शिंदे, संकलन सुहास चोगले यांचे आहे. सदर व्हिडिओज ना जास्तीत जास्त शेअर करावे असे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी केले आहे.

दुसऱ्या प्रोजेक्ट अंतर्गत
जळगाव शहरातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे आवाहने आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका सर्व सोशल मीडिया माध्यमांवर JCMC Digital नावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची, योजना, पाणीपुरवठा वेळापत्रकात होणारे बदल इत्यादी माहिती नागरिकांना त्वरित मिळावी यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम वर आपले खाते सुरू केले असून नागरिकांनी JCMC Digital या नावाने खाते शोधून त्यास लाईक आणि फॉलो करावे जेणेकरून त्यांना भविष्यात प्रसारित करण्यात आलेली माहिती त्वरित उपलब्ध होईल. तसेच जळगांव शहर महानगरपालिका तर्फे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल देखील सुरू करण्यात आले असून नागरिकांना व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन देखील माहिती उपलब्ध होणार आहे. सदर व्हॉट्सॲप चॅनल ची लिंक मनपा च्या सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका तज्ञ टीमची व्यवस्था करण्यात आली असून या टीम द्वारे सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या सी.एस.आर ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून तीन वर्षांसाठी महापालिकेचे सोशल मीडिया खाते मोफत हाताळण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या सोशल मीडिया खात्यांना लाईक आणि फॉलो करावे असे आवाहन आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.