---Advertisement---
जळगाव जिल्हा

पारंपरिक वाद्य वाजवून ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रमाचे उद्घाटन

---Advertisement---

मनोरंजन क्षेत्राने भारताची मान उंचावली,वेव्ह 2025 कार्यक्रमात मान्यवरांचा सूर

Sound and Picture Entertainment

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्र यांनी जागतिक स्तरावर भारताला मानाचे स्थान मिळवून दिल आहे. महाराष्ट्र राज्याचा वाटा सगळ्यात मोठा आहे.परिवर्तन संस्था नेहमीच उत्कृष्ट सांस्कृतिक कार्य करत असते. महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम देखील परिवर्तन ने उत्कृष्ट सादर केला आहे अशी भावना खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्राला लोक परंपरा संगीत नृत्य नाटक यासोबतच सिने उद्योग यामुळे महाराष्ट्र आघाडीचे राज्य आहे, असे उद्गार आमदार राजूमामा भोळे यांनी काढले. जळगाव येथे गंधे सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “ध्वनी चित्र तरंग” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजीवनी फाउंडेशन संचालित परिवर्तन जळगाव यांच्या वतीने अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रचे रिजनल मॅनेजर प्रवीण कुमारसिंग, नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार ,कार्यकारी अभियंता सुरेखा पवार, विद्यापीठातील गणित विभाग प्रमुख डॉ. किशोर पवार, रंगकर्मी नारायण बाविस्कर , चिंतामण पाटील ,गीतांजली ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

---Advertisement---

सर्वप्रथम महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वेव्ह 2025 ही चित्रफित दाखवण्यात आली. महाराष्ट्र गीतासोबतच लोकनृत्य , योगशिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी योगा व नृत्य, शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले . लहान मुलांनी नाटिका सादर करून रसिकांना आनंद दिला, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गीतामधून अभिवादन करण्यात आले .

ऑडिओ विज्युअल यांचा सांगोपांग इतिहास ऑडिओ व्हिज्युअल मधून मांडण्यात आला. भारतीय चित्रपट व मनोरंजन क्षेत्राचा आढावा घेणारा, इतिहास उलगडून दाखवणारा, यासोबतच याची आर्थिक बाजू याची सामाजिक बाजू हे सगळं उलगडत भारतीय भाषा व मनोरंजन क्षेत्र याची सांगड घालत अत्यंत सुंदर पद्धतीने हे क्षेत्र उलगडून दाखवले गेले. भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा यांचं तुलनात्मक विश्लेषण करून मनोरंजन क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी या कार्यक्रमातून उलगडल्या. टीव्ही विश्वातून भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म विश्वात प्रवेश करतो आहे. याचा देखील आढावा या कार्यक्रमात घेतला गेला. महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य आहे जे गेल्या 65 वर्षापासून नाट्य स्पर्धा आयोजित करते. यामुळेच मराठी नाटक देशातच नाही तर अगदी विदेशात देखील प्रसिद्ध आहे.

संगीत नृत्य दृकश्रावण माध्यम नाटक अशा विविध माध्यमांचा वापर करत हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, मनोज पाटील, होरिलसिंग राजपूत, योगेश पाटील, मंगेश कुलकर्णी, अक्षय नेहे, नेहा पवार , मोना निंबाळकर , आदींनी मेहनत घेतली .

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment