जळगाव जिल्हा

ज‍िल्हा सामान्य रूग्णालयात विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे लोकार्पण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२४ । जळगाव ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन 5 कोटी 57 लाख रूपयांच्या न‍िधीतून ज‍िल्हा रूग्णालयात एसएनसीयू युनिट कार्यरत करण्यात आला आहे. या युन‍िटचे उद्धाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. व‍िशेष नवजात शिशु काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. श‍िशु कक्षातील अत्याधु‍निक अद्यावत सुव‍िधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

एसएनसीयू युनिटच्या नूतनीकरणासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेतून 5 कोटी 57 लाखांचा न‍िधी मंजूर करण्यात आला होता. या न‍िधीतून एसएनसीयू व‍िभागाचे नूतनीकरण करण्यात आले. या कक्षात 45 युनिट कार्यरत आहेत. सध्या या व‍िभागात अत्याधुनिक कृत्रीम श्वासाचे मशीन व रेड‍ियंट वॉर्मर उपलब्ध आहेत. ज्याद्वारे कमी वजनांच्या व कमी दिवसांच्या नवजात बालकांवर सर्व प्रकारच्या उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जन्मजात न रडलेले बाळ व अध‍िक प्रमाणात कावळि असणाऱ्या बाळांवर उपचार सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इतर आजारांवरही उपचार उपलब्ध असून ज्यासाठी खासगी रूग्णालयांमध्ये खूप खर्च येतो त्या सर्व सुव‍िधा व‍िनामूल्य या कक्षात नवजात बालकांसाठी उपलब्ध असल्याची माह‍िती ज‍िल्हा शल्य चिक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील यांनी यावेळी ‍दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button