जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । येथील लिनेस क्लब जळगावतर्फे शहरात दोन ठिकाणी नुकतीच पाणपोई सुरू करण्यात आली.
नयनतारा गेस्ट हाऊससमोरील पाणपोईचे उद्घाटन नीलिमा सेठिया यांच्याहस्ते करण्यात आले. तर रायसोनी सायकल मार्ट जवळील पाणपोईचे उद्घाटन उज्ज्वल रायसोनी व किरण गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी पल्लवी लोढा यांची मदत लाभली, क्लबतर्फे सिंधी कॉलनीत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिलांना छत्रींचे वाटप करण्यात आले. कल्पना काबरा यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा दर्शना ललवाणी, शैला छोरिया, विजू बाफना, उज्ज्वल मुथा, सपना छोरीया, अलका कांकरिया, प्रिया दारा उपस्थित होत्या.