जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । जळगाव इंडियन मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण सोहळा दि 20 रोजी डॉक्टर उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ सुनील गाजरे यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुनील नाहाटा यांचेकडून पदभार स्विकारला . तसेच डॉ अनिता भोळे यांनी नूतन सचिव म्हणून डॉ तुषार बेंडाळे यांचेकडून पदभार स्विकारला. यावेळी IMA महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डाॅ. विलास भोळे आणि हास्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष डाॅ. स्नेहल फेगडे व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील या देखील यावेळी उपस्थित होत्या.
त्या सोबतच नूतन कार्यकारणीत डॉ. पंकज पाटील – कोषाध्यक्ष, डॉ. सुशील राणे व डॉ. धीरज चौधरी – सह सचिव,डॉ. विनोद जैन – जनसंपर्क अधिकारी, डॉ. पंकज शहा, डॉ किशोर पाटील, डॉ दीपक पाटील, डॉ.राहुल मयुर,डॉ. सारिका पाटील,डॉ. अनघा चोपडे – कार्यकारणी सदस्य म्हणून पदभार स्विकारला. या व्यतिरिक्त अन्य 8 उपसमितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी ही पदभार स्वीकारला. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्यस्तरीय इतर समितीवरअसणार्या डाॅ. जितेंद्र नारखेडे, डाॅ. अंजली भिरुड, डाॅ. लीना पाटील, डाॅ. रागिणी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
डाॅ.रुचा नवाल, डॉ नीलम पाटील यांनी सूत्रसंचालन केले व डॉ अविनाश भोसले यांनी आभारप्रदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाभिमुख आणि सार्वजनिक स्वास्थ्य विषयी उपक्रम हाती घेऊन जळगाव शहरात जनजागृती करण्याचा मानस डॉ अनिता विलास भोळे यांनी व्यक्त केला.