सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे आयोजित शिबिरात ३०० नागरिकांनी घेतली लस
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे जळगाव शहरातील इमाम अहेमद रझा चौक येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत लसीकरण करून घेतले.
सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे शहरातील भिलपुरा येथील इमाम अहेमद रझा चौक येथे भिलपुरा, नियामतपुरा, इस्लामपुरा आदी परिसरातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन हाजी सय्यद युसूफ अली यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात तिनशे नागरिकांनी लस घेत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सै.अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना कोविशील्ड लस स्वास्थासाठी कशी व किती फायद्याची आहे, याबाबत मार्गदर्शन केले तसेच दोन दिवस हे लसीकरण चालणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या डॉ. पल्लवी नारखेडे, सिस्टर मालिनी पवार, माया कोळी, योगिता कोळी, फाउंडेशनचे शेख नजीर उद्दीन, शेख नूर मोहम्मद, सय्यद ओवेश अली, रफिक रहमान, शेख अर्शद, योगिता रोकडे, योगिता दाभाडे, सलमान मेहबूब, अबरार शहा, अता ए मोईन अली, आदिल गनी आदींनी परिश्रम घेतले.