⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात आठवडाभरात हरभऱ्याचा भाव 400 रुपयांनी वाढला ; आता ‘इतका’ मिळतोय भाव?

जळगावात आठवडाभरात हरभऱ्याचा भाव 400 रुपयांनी वाढला ; आता ‘इतका’ मिळतोय भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 8 फेब्रुवारी 2024 । एकीकडे कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. मात्र दुसरीकडे हरभऱ्यासह तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात ५,८०० रुपयांवर असलेले हरभऱ्याचे भावाने ६ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.

बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. दररोज बाजार समितीत ८०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली. आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर ६,१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजेच हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ६०० ते ७०० रुपयापर्यंतचा अधिकचा भाव मिळत आहे. तुरीला देखील हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जळगाव बाजार समितीत रब्बी हंगामातील धान्य खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवकदेखील कायम असून, तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिर आहेत. हरभऱ्याला मागणी कायम असल्याने आगामी काही दिवसांत हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कीकडे हरभऱ्याच्या दरात वाढ होत असताना, दुसरीकडे सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घट होत आहे. सोयाबीनचे दर सद्यस्थितीत ४४०० ते ४५०० रुपयांवर आले आहेत. तसेच सोयाबीनची आवकदेखील बाजार समितीत कमी झाली आहे. शासकीय खरेदी नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.