जळगाव लाईव्ह न्यूज | २२ ऑगस्ट २०२३ । राज्यात शिक्षक पदाच्या भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. राज्यातील जळगावसह १३ जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 ‘टक्के रिक्त पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे.
या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे’, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.
१ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती होत आहे. या भरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता देण्यात आल्यामुळे आता धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पुणे, नगर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात शिक्षक भरती होणार आहे.