जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । भारतात यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३१ मे ला मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज असून त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्रात धडकेत. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सध्या खरीप हंगाम अगदी जवळ आला असलयाने शेतकरी वर्ग तयारीला लागला आहे. एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रावर होणार आहे.
अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे खरेदी करताना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे. तसेच कृषी विभागाने शेतक-यांना महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या पाकिटावर असलेली तारीख, वेस्टन टॅग पाहावे तसेच बियाण्याची थैली किंवा पॉकेट सांभाळून ठेवावे. हे महत्त्वाचे असल्याची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.
कृषी विभागाच्या शेतक-यांना सूचना
बियाणे बॅग किंवा पॉकेटचे वेस्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती हे सर्व कापणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावी.
भेसळाची शक्यता वाटल्यास बियाण्याच्या पाकीट वरून खातर जमा करावी.
बियाण्याची उगवण क्षमता खात्रीसाठी पॉकेट वरील तारीख पाहून घ्यावी.
बियाण्याची पिशवी मोहर बंद असल्याची खात्री करावी.
कमी वजनाच्या निविष्ठा छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठा विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करा.