⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | हवामान | दुष्काळाच्या वेशीवर : हवामान विभागाच्या प्रमुखांनी दिली अतिशय महत्त्वाची माहिती

दुष्काळाच्या वेशीवर : हवामान विभागाच्या प्रमुखांनी दिली अतिशय महत्त्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२३ । सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाच्या वेशीवर आहेत. गेल्या ऑगस्ट महिण्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान, पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

ऑगस्टमधील पावसाने 123 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
ऑगस्ट महिन्यातला या वर्षाच्या पावसाने 123 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 59.42 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील पाऊस हा सरासरीच्या 11 टक्के कमी पडला आहे. राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांच्या वेशीवर दुष्काळाचं संकट येवून ठेपलंय. 123 वर्षानंतर यंदाचा ऑगस्ट महिना सर्वाधिक कोरडा गेल्याची नोंद झालीय.

याआधी 1901 सालात ऑगस्ट महिना सर्वाधिक कमी पर्जन्यमानाचा होता, त्यानंतर यंदा तशी स्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. महाराष्ट्रास देशातल्या अनेक राज्यांत दुष्काळाचे ढग घोंगावत आहेत. महाराष्ट्राबरोबरच झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, मणिपूर, अरुणाचल, आसाम, लडाख, हिमाचल आणि कर्नाटकच्या काही भागात दुष्काळाची तीव्रता अधिक दिसू शकते.

पावसानं सुट्टी घेतल्यामुळे धरणांचीही पातळी कमी होत चाललीय. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागली असून जर आगामी काळात पाऊस न झाल्याने उरला सुरला हंगामही हातातून जाण्याची भीती आहे.

या जिल्ह्यात दुष्काळस्थिती उद्भवण्याची शक्यता
महाराष्ट्र बघितला तर कोकण वगळता नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद या जिल्ह्यात दुष्काळस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.