---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकरांनो.. पुढचे तीन दिवस घ्या काळजी; तापमानाबाबत आयएमडीने वर्तविला हा अंदाज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून यंदाचा उन्हाळा जळगावकरांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर जात असल्याने जळगावचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीही उष्ण वारे वाहत असून रात्री २ वाजेपर्यंत तापमान ४१ ते ३४ अंशांवर जात आहे. उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे. मात्र आजपासून पुढील तीन दिवस जळगावकरांना आग ओकणाऱ्या सूर्याचा ‘ताप’ सहन करावा लागेल.

tapman 2 jpg webp

हवामान खात्याकडून जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावात २५ मेदरम्यान तापमानाचा पारा ४६ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या आठवडाभरापासून जळगावकरांना “मे हीट’चा तडाखा जाणवत आहे. गेल्या दोन तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्याने थेट ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने माणसांसह पशु-पक्ष्यांचे जीव लाहीलाही झाले आहेत.

---Advertisement---

गेल्या दोन दिवसांतील हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान आहे. ‘आयएमडी’च्या नोंदीनुसार बुधवारी तापमानाचा पारा ४५.२ अंश सेल्सिअसवर होता. तापमानात वाढ झाल्यामुळे जळगावातील जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवला.आणखी तीन दिवस जळगावकरांना आग ओकणाऱ्या सूर्याचा ‘ताप’ सहन करावा लागेल. हवामान खात्याने जळगावला २५ मेपर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून यादरम्यान तापमानाचा पारा ४६ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज आहे.

काय काळजी घ्याल?

  • शक्यतो घराबाहेर पडू नका.
  • तहान लागली नसेल तरी दिवसभर सातत्याने पाणी पित राहावे.
  • पातळ, सुती, हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
  • बाहेर जाताना गॉगल, स्कार्फ, रुमाल, टोपीचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लिंबूपाणी, ताक, ओआरएस आदींचे सेवन करावे.
  • लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांनी जास्त काळजी घ्यावी

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---