---Advertisement---
हवामान

IMD Alert : जळगावसह 12 जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्वाचे, नागरिकांनी काळजी घ्यावी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२३ । मान्सूनच्या हालचालींनी वेग धरला असून आता महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. त्यापूर्वीच राज्यातील अनेक भागात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या 3-4 तासांत जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.

rain 1 2 jpg webp

IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज ठाणे आणि पालघरमध्येही रिमझिम पाऊस होऊ शकतो.

---Advertisement---

या जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता?
तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे.

येत्या 3 ते 4 तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---