---Advertisement---
गुन्हे अमळनेर

अमळनेरात अवैध मद्यसाठा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई अमळनेर शहरातील मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली असून यावेळी वाहनांमध्ये ५८ हजार रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा साठा मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

madyasatha amlner

याबाबत असे की, अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिर प्रवेशद्वार जवळील रोडवरून एका प्याजो रिक्षा मधून अवैधपणे दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या. दरम्यान १६ मार्च रोजी दुपारी पथकाने सापळा रचून छापा टाकला.

---Advertisement---

यावेळी अमळनेर शहराकडून येणारी बॅजो रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीजे ५०१९) याची चौकशी केली असता, या वाहनांमध्ये ५८ हजार रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा साठा मिळून आला. अमळनेर पोलिसांनी हा दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी वय-४६, रा.अमळगाव ता. अमळनेर याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात प्रवीण काशिनाथ चौधरी याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment