गुन्हेजळगाव शहर

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडसत्र; शहरात ५ ठिकाणी कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ नोव्हेंबर २०२१ | घरगुती गॅसचा साठा करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शुक्रवार दि.१२ रोजी कारवाई करण्यात आली. शहरात ५ ठिकाणी छापे टाकून तब्बल ११ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव शहरात विविध ठिकाणी प्रवासी रिक्षांमध्ये गॅसचा भरून काळया बाजारात विक्री केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हदीत वेगवेगळी ५ पथके तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार संजय पवार, पोहेकॉ. विकास वाघ, साहेबराव चौधरी, पोना. किरण चौधरी आदींच्या पथकाने शाहूनगर कॉम्प्लेक्सच्या कंपाउंडच्या भीतीलगत छापा टाकून मकसुदअली न्यायनअली सैय्यद (वय-६६, रा. भिस्तीवाडा पडतीशाळेच्या मागे शाहूनगर) यास अटक केली. त्याच्याकडून गॅस सिलेंडर व रिक्षात भरण्यासाठी लागणारे साहित्य असा ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई शनीपेठ भागातील काट्याफाईल येथे करण्यात आली. सहाय्यक फौजदार अनिल इंगळे, पोहेकॉ. जितेंद्र पाटील, पोना. नितीन बाविस्कर, राहुल बैसाणे, पोकॉ. पंकज शिंदे आदींच्या पथकाने केली. या कारवाईत शेख नदिम शेख रसुल (वय-४०, रा. काटया फाईल शनिपेठ) याला अटक करून त्याच्याकडून गॅस सिलेंडर व रिक्षात भरण्यासाठी लागणारे साहित्य असा ८३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई पोहेकॉ. कमलाकर बागुल, सुनिल दामोदरे, अनिल देशमुख, पोना. किशोर राठोड आदींच्या पथकाने शाहूनगरातील ट्राफिक गार्डनजवळ केली. यात जाकिर शेख चांद पिंजारी (वय-४५ रा. फाटया फाईल, शनिपेठ) व राजेश अर्जुन गोपाळ (वय-३८ रा. समतानगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. गॅस सिलेंडर व रिक्षात भरण्यासाठी लागणारे साहित्य असा १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चौथी कारवाई सहाय्यक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना. रणजित जाधव, पोकॉ. ईश्वर पाटील, पोकॉ. हरिश परदेशी, किशोर मोरे आदींच्या पथकाने जैनाबाद भागात वाल्मिक मंदिराजवळ केली. या कारवाईत कैलास विलास सोनवणे (वय-४५, रा. वाल्मिक नगर, जळगाव) व सुरज नारायण सोनवणे (वय-३०, रा. गेंदालाल मिल) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गॅस सिलेंडर व रिक्षात भरण्यासाठी लागणारे साहित्य असा २ लाख १० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पाचवी कारवाई जैनाबाद भागातील लेंडीनाल्याजवळ करण्यात आली. या कारवाईत शुभम राजु बोरसे (वय-२५, रा. वाल्मीक नगर, लेंडी नाल्या जवळ जळगाव), रिक्षाचालक संदिप अरुण चौधरी (वय-२९, रा. गणपतीनगर, पिंप्राळा), रिक्षाचालक किरण शालीक कोळी (वय-२५, रा. समतानगर, धामनगाव वाडा, जळगाव), रिक्षाचालक आरिफ अब्दुल रहेमान (वय-४६, रा. फातेमा नगर एमआयडीसी जळगाव), मोहम्मंद सलमान गुलाम शाहीद बागवान (वय-३९, रा. जोशी पेठ जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गॅस सिलेंडर व रिक्षात भरण्यासाठी लागणारे साहित्य असा ६ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोहेकॉ. महेश महाजन, पोना. प्रितमकुमार पाटील, श्रीकृष्ण देशमुख, योगेश घराडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

१२ जण ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये ११ लाख ५६ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/373925621179536

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button