---Advertisement---
जळगाव जिल्हा

वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोक रमजान महिन्यात सेवेचे उत्तम उदाहरण मांडू शकतात

---Advertisement---

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इफ्तार पार्टीत सोहेल अमीर शेख यांचे मार्गदर्शन

iptaar parti

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । रमजानच्या महिन्यात जकातचे न्याय्य वितरण आणि तत्सम अनेक उपासना हे त्याचे व्यावहारिक प्रकटीकरण आहे . वैद्यकिय सेवेतील लोक सेवाभावातून उत्तम उदाहरण मांडू शकतात असे प्रतिपादन इकरा महाविद्यालयाचे जनाब शेख सुहेल अमीर साहब यांनी आज केले. निमीत्त होते गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

---Advertisement---

या इफ्तार पार्टी प्रसंगी सोहेल अमीर शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. त्यांच्या सोबत सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, वैद्यकिय संचालक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,डॉ. माया आर्विकर, डॉ.हर्षल बोरोले अधिष्टाता डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद हास्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय,संचालक डॉ.डी.बी पाटील, प्राचार्य डॉ.आर के मिश्रा, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर, हॉर्टीकल्चरीस्ट व संचालक प्रा सतिष सावके, वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर वैद्यकीय संबंधित विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन व्यवस्थापन आणि विविध विद्या शाखांचे प्राध्यापक, व्याख्याते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तारनंतर लगेचच सोहेल अमीर शेख यांनी पुढे बोलतांना रमजान आणि रमजानच्या उद्देशांबद्दल सविस्तर प्रबोधन केले.

इस्लाम लोकांना बंधुता आणि प्रेम शिकवतो.या कार्यक्रमाच्या अप्रतिम आयोजनाबद्दल त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकार्यांचे त्यांच्या वतीने अभिनंदन केले. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विस्तृत लॉनमध्ये या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तारनंतर मगरीबची नमाज अदा करण्यात आली आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. एम डी अब्दुल्लाह यांच्या मार्गदर्शनानुसार मुस्लीम विद्यार्थी व महिला विद्यार्थिनीं व्यतिरिक्त महिला व पुरूष विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. यासोबतच या संस्थेशी संबंधित सर्व शिक्षक बंधू आणि इतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात मोठा उत्साह दाखवला व मुस्लिम विद्यार्थ्यांना रमजान व ईदच्या आगाऊ शुभेच्छा देण्यात आल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment