⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | खुशखबर! IDBI बँक ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मेगाभरती जाहीर

खुशखबर! IDBI बँक ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मेगाभरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँक म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 500 जागा भरल्या जाणार आहे. IDBI Bank Recruitment 2024

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आयडीबीआय बँकेच्या https://www.idbibank.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. IDBI Bank Bharti 2024

पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर भारत सरकार किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही. 02) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे 03) प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्यांचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म 31 जानेवारी 1999 पूर्वी आणि 31 जानेवारी 2004 नंतर झालेला नसावा. एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसींना तीन वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षांची सूट मिळेल. 1984 च्या दंगलीत बाधित झालेल्यांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल.

इतके शुल्क भरावे लागेल
अनुसूचित जाती/जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे.
जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी – 1000 रुपये

जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.