⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | पदवी उत्तीर्णांनो तयारीला लागा ; सरकारी बॅंकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी भरती जाहीर

पदवी उत्तीर्णांनो तयारीला लागा ; सरकारी बॅंकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी भरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 6432 रिक्त जागा आहेत. 6 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये PO/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींची भरती केली जाईल. पदवीधर उमेदवार IBPS PO भर्ती 2023 साठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल. IBPS PO Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे. IBPS PO Recruitment 2022

IBPS PO पदासाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर केली जाईल. IBPS PO भर्ती प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पीओ भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारी/फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल. IBPS PO Bharti 2022

रिक्त जागा तपशील
बँक ऑफ इंडिया – 535
कॅनरा बँक- 2500
पंजाब नॅशनल बँक – 500
पंजाब अँड सिंध बँक – 253
UCO बँक- 550
युनियन बँक ऑफ इंडिया – 2094

महत्वाच्या तारखा
अर्ज – 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022
PO भर्ती प्राथमिक परीक्षा – ऑक्टोबर २०२२
PO भर्ती मुख्य परीक्षा – नोव्हेंबर २०२२
मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2023

शैक्षणिक पात्रता – PO भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे.

अर्ज शुल्क :
सर्वसाधारण श्रेणी आणि इतर श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.850/- आहे.
SC/ST/PWD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 175/- आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
onalin अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.